google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

‘सीडीएस’ भरतीपूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षण निवडीसाठी २ जून रोजी मुलाखत

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : भारतीय सशस्त्र दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे १६ जून ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सीडीएस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी या प्रशिक्षणाच्या मुलाखतीसाठी २ जून २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे. 
           सीडीएस प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी), नवीदिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला असावा.  मुलाखतीसाठी येतेवेळी सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर सीडीएस ६५ कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबतच्या परिशिष्टाची छायांकित प्रत भरुन सोबत आणणे आवश्यक राहील. 
             याबाबत अधिक माहितीसाठी  प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या कार्यालयाशी अथवा ०२५३-२४५१०३२, ९१५६०७३३०६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा या training.petenashik@gmail.com ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!