google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सोमनाथ घार्गे नगरचे नवे एसपी!

मावळते एसपी राकेश ओला मुंबईचे पोलीस उपायुक्त

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला हे मुंबईचे पोलीस उपायुक्त झाले आहेत. राज्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश आहे. दरम्यान, नवे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी यापूर्वी जिल्ह्यात श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे जिल्ह्याची त्यांना माहिती आहे.
                पोलीस अधीक्षक राकेश ओला हेही श्रीरामपूरलाच यापूर्वी नियुक्तीस होते. त्यानंतर नगरला ‘एसपी’ म्हणून आले. नवे एसपी सोमनाथ घार्गे यांनीही श्रीरामपूरला ‘ड्यूटी’ केली आहे. नवे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगडहून अहिल्यानगरला बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षभरात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या घटना घडल्यानंतर स्वतः तेथे उपस्थित राहत स्थानिक पोलिस ठाण्यांचे अधिकारी यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि दिनेश आहेर यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी मदत झाली. स्थानिक पोलिस ठाण्याइतकाच जिल्हाभरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा संपर्क आहे. 
           गुन्हे घडूच नयेत, म्हणून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर जिल्हाबंदीही करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही कोणतेही बालंट न येता पार पडले. मात्र, गत काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक राकेश ओला हे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर बदलून जातील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!