google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवाश्यात वाळू माफियांवर कारवाई

सहा आरोपीविरुद्ध कारवाई; दोघे ताब्यात, चार फरार; 27 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; संतोष खाडे यांच्या पथकाची कामगिरी

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त माहिती मिळाल्याने केलेल्या कारवाईमध्ये नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी कारवाई केलेल्या सहा आरोपींपैकी दोन जण ताब्यात असून चार जण फरार आहेत. यावेळी पोलिसांनी एकूण 27 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
                 याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे दि.१६ रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौणखनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कापूर डहू, ज्ञानेश्वर मंदीर मागे नेवासा खुर्द ता. नेवासा येथे काही इसम डंपर व टेम्पोच्या सहाय्याने अवैध रित्या बेकायदेशीर चोरुन वाळूची वाहतूक करणार आहेत. आता गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ नेवासा पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले.
             वरील नमूद ठिकाणी कापूर डहू ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा खुर्द ता. नेवासा येथे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहचले असता एक पांढऱ्या रंगाचा डंपर येताना दिसला तो जवळ येताच पोलीस पथकाने त्यास हात करुन थांबवून त्यावरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची ओळख सांगून डंपरची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर डंपरचा नं. MH-१७- AG ४१७४ असा असून त्यामध्ये वाळू भरलेली मिळून आली. त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) सोमनाथ लक्ष्मण पवार वय ३४ वर्षे रा. खडका फाटा ता. नेवासा असे सांगून मालकाबाबत विचारपूस केली असता त्याने डंपर मालकाचे नाव राहुल बाळासाहेब शिंदे रा.माकोटा ता. नेवासा (फरार) असे सांगून मालक पोलीस पथक आल्याचे पाहून पळून गेला आहे.
            तसेच पकडलेल्या डंपरच्या पाठीमागून एक विटकरी रंगाचा टेम्पो ७०९ मॉडेलचा येताना दिसला तो जवळ येताच पोलीस पथकाने त्यास हात करुन थांबवून त्यावरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याचे सांगून टेम्पोचो पंचासमक्ष पाहणी केली असता सदर टेम्पो नं. MH-११- T-८४६ असा असून त्यामध्ये वाळू भरलेली मिळून आली. त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) सागर शिवाजी माळी वय- २० वर्षे रा. गंगानगर ता. नेवासा असे सांगून मालकाबाबत विचारपूस केली असता त्याने टेम्पो मालकाचे नाव नामू कुसळकर (फरार) रा. गंगानगर ता. नेवासा (पूर्ण नाव माहित नाही) असे सांगितले. टेम्पोच्या पाठीमागून एक पांढऱ्या रंगाचा बिगर नंबरचा टाटा कंपनीचा डंपर येताना दिसला त्यावरील चालकास हात करुन थांबविले असता पोलीस पथक असल्याचे पाहून डंपर सोडून पळून गेला. पंचासमक्ष पाहणी केली असता डंपरमध्ये वाळू भरलेली मिळून आली. सदर पकडलेल्या इसमांना डंपर मालकाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव छोटू लष्करे (पूर्ण नाव माहित नाही) रा. नेवासा खुर्द ता. नेवासा (फरार) असे असल्याचे सांगितले.
            वरील प्रमाणे पकडलेली डंपर व टेम्पोवरील चालक हे कापूर डहू ज्ञानेश्वर मंदीर मागे नेवासा खुर्द ता. नेवासा येथून विनापरवाना बेकायदा चोरुन वाळूचा उपसा करुन ती ढंम्पर व टेम्पोच्या सहाय्याने वाहतूक करुन तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या वाहतूक करताना मिळून आले त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे
१) १०,५०,०००/- रु. किं.चा टाटा कंपनीचा ढंम्पर त्याचा नं.MH-१७-AG-४१७४
२) ८,००० /-रु.किं.ची ०२ ब्रॉस वाळू टाटा कंपनीचा ढंम्पर त्याचा नं. MH-१७-AG-४१७४ मध्ये
३) ६,००,००० /- रु. किं.चा ७०९ मॉडेलचा टेम्पो त्याचा नं. MH-११-T-८४६ असा
४) ८,०००/- रु.किं.ची ०२ ब्रॉस वाळू टेम्पो नं.MH-११-T-८४६ असा मध्ये भरलेली
५) १०,५०,००० /-रु. किं.चा टाटा कंपनीचा ढंम्पर बिगर नंबरचा त्यामध्ये अर्धा ब्रास वाळू असलेला.
             असा एकूण २७,१६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करुन नेवासा पोलीस स्टेशन येथे येऊन एकूण २७,१६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ०६ आरोपींविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेवासा पोलीस स्टेशन गु.आर.क्र.६७७/२०२५ भारतीय न्याय संहिता स्तंभ ३०५(ई), ३(५) सह पर्यावरण संरक्षण कायदा स्तंभ ३/१५ पुरावा म्हणून
           सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबमें सो, अपर. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, डॉ. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक सो यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकों दिगंबर कारखेले, पोहेकों मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकों अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोकॉ सुनिल दिघे, पोकों अमोल कांबळे, पोकॉ संभाजी बोराडे, पोकॉ विजय ढाकणे, पोकों दिपक जाधव, पोकों जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.
पहा कारवाईचा व्हिडिओ ****
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!