
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेवासा शहरातील सावित्रीबाई फुले -फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुणे येथील सुप्रसिध्द बुधराणी नेत्रालय यांच्याकडून डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण यांनी केले. प्रमुख मान्यवराच्या हस्ते आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मानवंदना करण्यात आली. समाजाच्या कल्याणासाठी आण्णा भाऊने केलेले संघर्ष अंगीकारावे, असे आवाहन प्रमुख वक्ते संजय गायकवाड यांनी केले. संघर्षमय जीवनात समाज घडविण्याचे महान कार्य करून आण्णा भाऊच्या कार्यातुन दिसुन येते, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी काढले.
कार्यक्रमाच्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या वेळी सतीश गायके, फारुख अत्तार, डेव्हिड साळवे, अनिल सोनवणे, फकिरा चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते भैय्या चव्हाण, अभिषेक चव्हाण, मनोज चव्हाण, पप्पु चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, मनेष चव्हाण, रामा चव्हाण, सुनील गायकवाड यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. आभार अनिल चव्हाण यांनी केले.



