google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

खोट्या गुन्हयातील नाव वगळा, अन्यथा रस्त्यावर उतरू…

अँड. संजय सुखदान समर्थनार्थ व्यापारी,सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिकांचा इशारा

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : येथील व्यापारी कमिटीचे सदस्य अँड. संजय लक्ष्मण सुखधान यांच्यावर नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या खोटया गुन्हयातील नाव वगळण्यात यावे, या मागणीसाठी सोमवार (दि.११) रोजी त्यांच्या समर्थनार्थ नेवासा येथील व्यापारी,सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्रित येऊन नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिले. निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातांना सर्वधर्मीय व सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आल्याने नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणाला मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी व्यापाऱ्यांनी काही बंद ठेवला होता.
                 नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी नेवासा येथील पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ सर्वजण जमले होते. यामध्ये व्यापारी, सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग होता. या जमलेल्या सर्व बांधवांनी अँड. संजय सुखदान यांना बरोबर घेऊन नेवासा शहरातील मुख्य पेठेतून नेवासा पोलीस स्टेशनकडे निघाले.
           जातांना एक एक व्यक्ती सहभागी होत गेला आणि नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणात निवेदन देण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे अँड.सुखदान यांचे हितचिंतक सर्वसामान्य माणूस बरोबर असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
   
           यावेळी नेवासा व्यापारी कमिटीच्या वतीने कुणाल मांडण यांनी आलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक यांचे स्वागत करत प्रास्ताविक केले. अँड. संजय नाना सुखदान हे लढवय्या नेतृत्व असून ते गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शन करून आर्थिक मदतीचा हात ही देतात अतिक्रमण काळात व्यापारी वर्गाच्या ते पाठीशी राहिले. त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
            यावेळी समर्पण फाऊंडेशन, नेवासा व्यापार समिती, नेवासा प्रेस क्लब, नेवासा वकील संघ, आरपीआय, शिवसेना उबाठा गट यांनी निवेदन देऊन अँड.  संजय सुखदान यांना निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला.
            यावेळी समर्पण फाऊंडेशनच्या वतीने डॉ. करणसिंह घुले, उबाठा शिवसेनेचे बालेंद्र पोतदार, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, महेश मापारी, स्वप्नील मापारी, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संदीप आलवणे, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारूवाले, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, वंचीत बहुजन आघाडीचे विजय गायकवाड, प्रेस क्लबचे अशोक डहाळे, सुधीर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले
        
              यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून अँड. संजय सुखदान हे सर्वसामान्य माणसांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचे खोट्या गुन्हयात आकसबुद्धीने टाकलेले नाव वगळावे अशी मागणी केली. इतरांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या अँड. संजय सुखदान सारख्या लढवय्या व्यक्तिमत्वावर जर असा अन्याय होत असेल तर आम्ही व्यापारी, नागरीक सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरू व तीव्र आंदोलन छेडु असा इशारा यावेळी दिला.
        यावेळी नेवासा पोलीस स्टेशनला नव्याने आलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी नागरिक व्यापारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “संजू नाना तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
माझ्यावरील खोटा गुन्हा आकस बुध्दीतूनच
आम्ही नेहमी अन्यायाच्या विरोधातच लढत आलो आहे. येथे फक्त शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. हा मोर्चा नाही,अन्यथा हजारोंच्या संख्येने येथे गर्दी झाली असती. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आकस व सूडबुद्धीने एका अपघाताच्या खोटया गुन्हयात गोवले आहे. -अँड. संजय सुखदान
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!