ब्रेकिंग
शनिशिंगणापुर देवस्थान आर्थिक फसवणूक प्रकरण
देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक; सायबर पोलिसांची कामगिरी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शनिशिंगणापुर देवस्थान आर्थिक फसवणुक प्रकरणाचा दि. १२/०७/२०२५ रोजी शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन दाखल गुन्हा रजि नंबर १६५/२०२५ भा.न्या.सं. ३१८(४),३३६ (३), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम ६६ (डी) प्रमाणे दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर हे करत आहेत.
वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना सदर गुन्हयाचा बारकाईने व सखोल तपास करण्यासंदर्भात सुचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सदर गुन्हयाचे तपासकामी सागर ढिकले यांचे अधिपत्याखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे व सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन निष्पन्न आरोपीपैकी आरोपी संजय तुळशीराम पवार वय-३८ रा-सोनई ता-नेवासा ता-अहिल्यानगर (लिपीक शनिशिगणापुर देवस्थान शनिशिंगणापुर) व सचिन अशोक शेटे वय-४१ रा-शनिशिणापुर ता-नेवासा जि-अहिल्यानगर (CCTV प्रमुख शनिशिंगणापुर देवस्थान शनिशिंगणापुर) यांना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपासकामी त्यांना नमुद गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे व सायबर पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांचे पथकाने केलेली आहे.



