जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात
अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील देवगड फाटा येथील अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी जिजाऊंबद्दल केलेल्या भाषणाने सर्वजण प्रभावित झाले. डॉ. शैलजा भदगले यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंदांची होमिओपॅथीची कल्पना मांडली की, ॲलोपॅथ येऊन रुग्णांवर उपचार करतो आणि त्यांना त्यांचे औषध देतो. होमिओपॅथ येऊन त्याचे औषध देतो आणि कदाचित ॲलोपॅथपेक्षा जास्त बरे करतो, कारण होमिओपॅथ त्याच्या रुग्णांना त्रास देत नाही, परंतु निसर्गाला उपचार करण्यास परवानगी देतो.
यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी युवकांचे कर्तव्य व राष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतिक सराफ यांनी करून आभार प्रकट केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पंकज दुग्गड, डॉ. शंकरराव शिंदे, डॉ. संजय भदगले, डॉ. शैलजा भदगले, डॉ. बेग व इतर शिक्षक उपस्थित होते.