सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी
लोकनेते वसंतराव होंडे पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम
नेवासा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकनेते स्वर्गीय वसंतराव होंडे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून राष्ट्रपुरुषांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. यावेळी शिवगीते, भीमगीते, देशभक्तीपर गीते गाऊन खऱ्या अर्थाने राष्ट्र पुरुषांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मा. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, डॉ. शंकरराव शिंदे, बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखदान, महेश मापारी, राजेंद्र मापारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, भास्करराव लिहिणार, अनिल शिंदे, काशीविश्वेश्वर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पत्रकार मकरंद देशपांडे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, योगेश रासने, अँड.चंद्रकांत कदम, बहुजन नेते गणपतराव मोरे, प्रा. देविदास साळुंके, नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक अन्सार शेख, बहुजन नेते विकास चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण, पास्टर प्रकाश चक्रनारायण, पास्टर सुभाष चक्रनारायण, व्यापारी अभयकुमार गुगळे, स्व.वसंतराव होंडे पाटील प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक श्रीमती शालिनीबाई गायकवाड, अध्यक्ष रंजनदादा जाधव, अरुण जाधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रंजनदादा जाधव व अरुण जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी संभाजीनगर येथील वाद्यवृंदाच्या वतीने गायक गौरव पवार, गायक अमितकुमार, प्रवरासंगम येथील गायिका मुमताज शेख, नेवासा येथील गायक सुधीर चव्हाण, राजेंद्र परदेशी, प्रा.अमोल जाधव, रमेश कणगरे, अभयकुमार मोहिते यांनी देशभक्तीपर व राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर आधारित गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. देशभक्ती गीतांना नगर येथील दिलावर शेख,(सिंथेसायझर) अंकीत (ढोलक)ड्रमर यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संभाजीराव माळवदे, सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू, आर पी आयचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे, पप्पू इंगळे, विजय कावरे, हुसेन शेख, सतीश म्हस्के, नितीन भालेराव, रविंद्र पिंपळे, पंकज जेधे, सुरेश चक्रनारायण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर राष्ट्रपुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रनाचे संयोजक रंजनदादा जाधव यांनी उपस्थित मान्यवरासह रसिकांचे आभार मानले.