कृषीवार्ता
बँक खाती आधार संलग्न करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; जिल्ह्यातील 90 हजार 113 लाभार्थ्याची खाती आधार विना
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 90 हजार 113 लाभार्थ्याची बँक खाती आधार संलग्न करणे प्रलंबित आहेत. केंद्र शासनाकडून योजनेचा 13 वा हप्ता वितरणापूर्वी लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले असुन आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यांमध्ये यापुढील लाभ वितरीत केला जाणार आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थीस व्यक्तीश: संबंधित बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करून घेणे आवश्यक असुन पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.