google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

ट्रॅक्टर चोरांना सिनेस्टाईल पाठलाग करुन २४ तासात केले जेरबंद; ६,६५,०००/- हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त 

                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा पोलीस स्टेशन हददीतील मौजे बकुपिंपळगांव ता. नेवासा. जि. अहिल्यानगर या ठिकाणी दि. २७ मे रात्री फिर्यादी गणेश पोपट शिंदे वय ३२ वर्षे रा. बकुपिंपळगांव ता नेवासा यांचे घरासमोरुन पत्राचे शेडमधुन स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
           सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक यांना सदर गुन्हयाबाबत मार्गदर्शन करुन रवाना केले असता गुन्हे शोध पथक हे आरोपीचा तांत्रिक विश्लेषण, खब-यामार्फत शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदर चोरी झालेला ट्रॅक्टर हा विक्री करण्यासाठी प्रवरासंगम परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथक यांनी प्रवरासंगम परिसरात सापळा लावला असता रात्रौ ९ वा.चे. सुमारास सदर स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा एका टाटा एसी कंपनीच्या मालवाहु गाडीमध्ये असल्याचे निर्देशनास आले.
         सदर टाटा एसी कंपनीची मालवाहु चारचाकी गाडी पोलिसांची चाहुल लागताच प्रवरासंगमवरुन सिध्देश्वर मार्गे पळुन गेली सदर गाडीचा गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन सिध्देश्वर गोधेगांव भालगांव शिवारात पकडली असता गाडीमधील इसम यांना पोसई पाटील यांनी नाव, गाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे मयुर संजय भोसले वय २० वर्षे रा. कासारवाडी. ता. पाथर्डी. जि. अहिल्यानगर, महेश ज्ञानेश्वर मुजमुले वय २० वर्षे रा. जवखेडे.ता. पाथर्डी, महेश अशोक बोरुडे वय २७ वर्षे रा. प्रवरासंगम ता नेवासा, रविंद्र मारकस मोरे वय २४ वर्षे रा. बकुपिंपळगांव. ता. नेवासा, प्रणव कृष्णा पवार वय २२ वर्षे रा. प्रवरासंगम ता. नेवासा, दुर्गेश बाबासाहेब बेडकर वय १९ वर्षे रा.प्रवरासंगम ता नेवासा असे सांगितले. 
           सदर टाटा एसी कंपनीची मालवाहु चारचाकी गाडीचे पाठीमागील हौदयामध्ये असलेल्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर ट्रॅक्टर हा नमुद गुन्हयांतील फिर्यादी यांचे घरासमोरील पत्राचे शेडमधुन चोरी केले बाबत कबुली दिली. सदर स्वराज कंपनीचा एम एच १७ सी एक्स ७३५६ किंमत अंदाजे २,६५,००० /- रु किंमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर तसेच टाटा एसी कंपनीची गाडी नं एम एच १६ सी.डी. ४९४४ किंमत अंदाजे ४,००,०००/- रुपये असे एकुण ६,६५,०००/- हजार रुपये किंमतीचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करुन नमुद आरोपी यांना सदर गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली असुन सदर गुन्हांचा पुढील तपास गुन्हे शोध पथकांचे पोसई विकास पाटील हे करत आहेत.
           सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परि. पोलीस.उप.अधीक्षक, पोसई विकास पाटील, पो.हवा. अजय साठे, पो.कॉ आप्पासाहेब तांबे, सुमित करंजकर, अवि वैदय, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, राम वैदय, भारत बोडखे, गणेश जाधव सायबर सेल श्रीरामपुर चे पो.हवा. सचिन धनक यांचे पथकाने केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!