आरोग्य व शिक्षण
ग्रीन स्पार्क प्री प्रायमरीच्या चिमुकल्यांची आषाढी वारी
वारकरी वेषात रामकृष्ण हरीचा गजर
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सारसनगरमधील ग्रीन स्पार्क प्री प्रायमरी स्कुलमध्ये आज् शाळेतील सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या मातांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा महत्वाचा भाग असलेल्या आषाडी वारीचा उत्सव साजरा केला. नव्या पिढीला आपल्या संत परंपरा आणि संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून शाळेच्या संस्थापक हेमलता पाटील आणि संचालिका योगिनी गाडळकर ह्यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा आषाढी वारीचा उत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रातील महिला संत या विषयावर आज अतिशय सुंदर उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेषात टाळाच्या गजरात, ठेका धरत रामकृष्ण हरीचा जयघोष केला. तसेच सर्व माता पालकांनी स्त्री संतांच्या कार्याची माहिती मुलांना सांगत अभंग, फुगडी यांचे सादरीकरण केले.
सर्व जाती, धर्माला बरोबर घेऊन चालणाऱ्या विठूरायाच्या वारीबद्दल मोजक्या परंतु प्रभावी शब्दात विठ्ठलाच्या भूमिकेतून साईदीप गांगर्डे याने मोलाचा संदेश दिला. अनुश्री अरुण हिने रखुमाईची भूमिका साकारली तर युवीका वाघमारे, वैदेही पाटील, खुशी शिंदे, हर्षित पाटील, अर्षम भगत, आयुष मेकल ह्या विद्यार्थ्यांनी ही संत आणि वारकऱ्यांची भूमिका साकारून वारीचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या मातांनी ही स्त्री संतांची माहिती दिली ह्यात पूजा गांगर्डे- संत जनाबाई, पल्लवी वाघमारे- संत मुक्ताबाई, प्रिया अरुण- संत सखुबाई,
शिवगंगा मेकल- संत बहिणाबाई ह्या मातांनी विशेष सहभाग नोंदवला.