google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

फिरते मोफत वाचनालय हे पवित्र वाहणारी ज्ञानगंगा

हभप स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज; 'शब्दगंध'चा 'फिरते वाचनालय आपल्या दारी' उपक्रम

                                    स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील गोगलगाव येथे ‘फिरते मोफत वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्रीक्षेत्र देवगड येथील ह भ प गुरुवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व हा उपक्रम नेवासे तालुक्यात वाहणारे पवित्र ज्ञानगंगा आहे, याचा लाभ समाजाने घ्यावा, असे आवाहन करून आशीर्वाद दिले.
             या प्रसंगी मा. कुलगुरु डॉ अशोकराव ढगे, प्राचार्य डॉ किशोर धनवटे, ‘शब्दगंध’चे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी, सदस्य पांडुरंग रोडगे, तसेच सरपंच दिलीपराव मते, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक अनिलराव मते, शैक्षणिक पर्यवेक्षक हरिश्चंद्र मते ,नारायण डांगे, बाळासाहेब कोहोक, विश्वनाथ मते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           डॉ धनवटे यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ ढगे म्हणाले की फिरत्या मोफत वाचनालयातील पुस्तके व ग्रंथ आपली संस्कृती श्रेष्ठ असल्याची साक्ष आहेत. याच्या वाचनाने आपण जगभर सुसंस्कृतपणाचा आदर्श ठेवला आहे. या पुढील काळात पुस्तकांचे वाचन करून ग्रंथांचा आदर करून ज्ञानदेवतेची आराधना केल्यास भावी पिढी ज्ञानसंपन्न होईल. कलावंत दिगंबर गोंधळी यांनी संबळ वाजून देवदेवतांचे स्मरण करून पुस्तकाची महती पोवाडा गाऊन सर्वांचे लक्ष वेधले.
                पांडुरंग रोडगे यांनी शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर यांच्या पाठिंब्यामुळे आमचा उपक्रम वाढत आहे, असे प्रतिपादन करून सर्वांचे मनःपूर्वक ऋणनिर्देश व्यक्त केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!