google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू

विहिरीत पडलेले होते मांजर; मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा मृत्यू; नेवासा तालुक्यातील दुर्दैवी घटना

                                      स्वराज न्यूज नेटवर्क

अहमदनगर: विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास वाकडी ( ता. नेवासा, जि. अहमदनगर ) येथे घडली. ऐन पाडव्याच्या दिवशी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडल्याने वाकडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
             याबाबत अधिक माहिती अशी की वाकडी येथील अनिल बापूराव काळे यांच्या वस्तीजवळ वापरत नसलेली 40 ते 50 फूट खोलीची जुनी विहीर आहे. या विहिरीत गाईंच्या गोठ्यातील शेण-मूत्र सोडले जाते. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी पाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता सदर विहिरीमध्ये मांजर पडले असता त्या मांजरीला काढण्यासाठी विशाल अनिल काळे उर्फ बबलू (वय 28 वर्षे) हा विहिरीमध्ये उतरला असता विहिरीतील शेण-मूत्र मिश्रित पाण्यामध्ये बुडू लागल्याने त्याचे वडील अनिल बापूराव काळे (वय 55 वर्षे) हे विहिरीत उतरले. ते ही बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी माणिक गोविंद काळे (वय 65 वर्षे) हे विहिरीत उतरले, त्यांनतर संदीप माणिक काळे (वय 32 वर्षे) हे विहिरीत उतरले. त्यांनतर त्यांना वाचवण्यासाठी विजू माणिक काळे (वय 35 वर्षे) हे विहिरीत उतरले, त्यांनतर त्यांचेकडे असलेला गडी बाबासाहेब गायकवाड (वय 40 वर्षे) हा ही विहिरीत उतरला.
               एकमेकांना वाचविण्यासाठी एका पाठोपाठ उतरलेले पाच जण विहिरीतील शेण-पाणी मिश्रित गाळामध्ये अडकून मृत पावले. विहिरीत शेण-मूत्र मिश्रित पाणी असल्याने विहिरीत गॅस तयार होऊन त्याने गुदमरून मरण पावल्याची घटना घडली. तर विजय माणिक काळे (वय 35 वर्षे) विहिरीतील गॅसने गुदमरल्यामुळे त्यास अहमदनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!