google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

मिशन 13 मे- सण मतदानाचा !’

शिक्षण विभागाच्या वतीने उपक्रमाचे आयोजन; मतदार जनजागृतीसाठी स्पर्धांचे आयोजन

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 टक्के मतदानाची भूमिका बजवावी त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रदीप पाटील (तहसीलदार – निवडणूक) यांच्या संकल्पनेतून  जिल्हा परिषद,शिक्षण विभाग,अहमदनगरच्या वतीने “मिशन १३ मे – सण मतदानाचा” या नाविन्यपूर्ण सहा स्पर्धांचा समावेश असलेल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी,शिक्षक, नागरिक मोठया प्रमाणात यात सहभागी व्हावे व मतदानामध्ये देखील सहभागी व्हावे असे आवाहन स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
   
             निबंध, चित्रकला, कविता, घोषवाक्य, पोस्टर, मतदान प्रबोधनात्मक व्ही.डी.ओ.(लघुपट /माहितीपट) निर्मिती अशा स्वरूपाच्या सहा प्रकारच्या स्पर्धा एकूण चार गटात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या सर्व स्पर्धांसाठी १) पाचवी ते सातवी २)आठवी ते दहावी ३)अकरावी ते पदवीधर ४) खुला गट असे चार गट आहेत.विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
    
           सर्व गटांसाठी निबंध स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे १) मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य २) लोकशाही आणि मतदानाचा हक्क ३) चला मतदानाला ४) मतदार राजा जागा हो ४)माझे आई-वडील मतदानाला जाणारच.
घोषवाक्य व कविता स्पर्धेसाठी विषय- मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मी अहमदनगर आहे-मी माझ्यासाठी मतदान करणार, छोडकर अपने सारे काम ..चलो करो पहिले मतदान
                   चित्रकला व पोस्टर स्पर्धेसाठी विषय- १)मतदान केंद्र -भारताचे शक्तिस्थान २) मतदार जनजागृती ३) अहमदनगरच्या मतदार राजा जागा हो,१३ मे ला लोकशाहीचा धागा हो.
    
               सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या साहित्यावर स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर व गटाचा उल्लेख करून आपले स्पर्ध  साहित्य 30 एप्रिलपर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग, अहमदनगर या ठिकाणी समक्ष /पोस्टाने/कुरिअरद्वारे जमा करावयाचे आहे. तसेच वरीलपैकी कुठल्याही एक विषयावर व्हिडिओ व लघुपट निर्मिती करावयाची असून देशातील पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या 9002109003 या व्हाट्सअप क्रमांकावर व्हिडिओ व लघुपट पाठवायचे आहेत.
  
              जास्तीत जास्त शिक्षक ,पालक , विद्यार्थी व नागरिक यांनी या “मिशन १३ मे- सण मतदानाचा! “उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन राहुल पाटील( उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ),अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी), मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार), डॉ.अमोल बागुल(जिल्हा मतदारदूत) व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!