google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगराजकिय

शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा

अध्यक्षपदावरून होणार निवृत्त; निर्णय मागे घेण्याचे कार्यकर्त्यांचे साकडे 

                                  स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन पार पडले. यावेळी शरद पवार यांनी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली.
         
                   राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे काही नेते रडल्याचेही पाहायला मिळाले.
          शरद पवार हे निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत सभागृह न सोडण्याची कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. तसेच सुनील तटकरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले. तसेच पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे.

अजित पवार यांचे खडे बोल !

            सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या. पवारसाहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

               साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, असाच परिवार जात राहील. साहेब आहेतच ना, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे. साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. साहेबांचा निर्णय एक धक्का आहे पण साहेब आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चालणार आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको? या शब्दांत चार खडे बोल कार्यकर्त्यांनी सुनावले. नवीन येणारा अध्यक्ष साहेबांशी चर्चा करुन निर्णय घेईल. साहेब काल निर्णय जाहीर करणार होते. परंतु काल महाविकास आघाडीची सभा होती. त्यामुळे हा निर्णय आज जाहीर केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!