google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

नेवाश्यात ‘लाडकी’च्या मोहिमेला चांगला प्रतिसाद

सुमारे 97 ऑनलाइन व 267 ऑफलाइन अर्ज दाखल

                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मदत मिळावी यासाठी नेवासा नगर पंचायतीच्या वतीने दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये लाडक्या बहिणीचे सुमारे 97 ऑनलाइन व 267 ऑफलाइन अर्ज भरण्यात आले तसेच योजनेबाबत जनजागृती करण्यात आली.
            राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. शासन विविध यंत्रणांद्वारे राज्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाला आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही सरकारने कमी केली आहेत. उत्पन्नाचा दाखला आता आवश्यक नसल्याने तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रातील महिलांच्या रांगाही कमी झाल्या आहेत.
.
                     नेवासा नगरपंचायत द्वारा राबवण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष मोहिमेसाठी पाच केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आढाव, सुशील चक्रनारायण, राजेश्वर सोनवणे, प्रताप कडपे, परशुराम डौले, विलास आर्ले, नवनाथ मतकर, मनीषा मापारी, सागर गाडे हे योजनेचे काम पाहत होते. या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त अर्ज सादर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले तसेच योजनेचे ऑनलाइन अर्ज नारी शक्ती मोबाईल ॲपद्वारे भरण्यात आले. नेवासा नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के यांनी दोन दिवसात लाडकी बहीण योजनेची जनजागृती करून 97 ऑनलाईन व 267 ऑफलाईन अर्ज भरल्याची माहिती दिली.
           यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका ऋचा कलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका हिराबाई देशमुख, उषा लालबिगे, मन्नाबी बागवान, संध्या बडवे, संगीता गडाख, संध्या जाधव, मीरा आगळे, नंदा उगले, माधुरी जाधव, आस्मा शेख, कावेरी शिंदे, मंगल भाकरे व स्वाती बोर्डे यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!