google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मतदान केंद्र असलेल्या शाळांना सुट्टी जाहीर

१ व २ डिसेंबर रोजी मिळणार सुट्टी

                                     स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ अनुषंगाने जिल्ह्यातील ११ नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये दि.२ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत.
             जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत मतदानाच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी व कर्मचारी दि.१ डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दि.१ डिसेंबर रोजी व दि.२ डिसेंबर मतमोजणीच्या दिवशी ह्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
          निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही सुट्टी घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!