ब्रेकिंग
नेवाशात १८ हजार ७१२ मतदार निवडतील आपला नगराध्यक्ष
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४,७१६ मतदारांची वाढ; मे २०१७ नंतर होणार नगरपंचायत निवडणुक

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा नगर पंचायतीच्या निवडणूक वेळापत्रकावरील आक्षेपांच्या सुनावणीनंतर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे एकूण मतदारांची संख्या ४,७१६ ने वाढली आहे. एकूण १८,७१२ पात्र मतदार आहेत जे जनतेतून त्यांचा पहिला नगराध्यक्ष निवडतील.
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वात कमी ४३३ मतदार आहेत, तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक १,४८९ मतदार आहेत. नेवासा नगरपंचायत स्थापनेनंतर मे २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत १३,९९६ मतदार होते. ४,७१६ मतदारांच्या वाढीसह, २०२५ च्या निवडणुकीत ९,२९२ पुरुष आणि ९,४२० महिलांसह एकूण १८,७१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
नेवासा नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांपैकी दहा प्रभागांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. प्रभाग २, ३, ४, ६, ७, ९, १२, १३, १५ आणि १६ मध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे. १, ५, ८, १०, ११, १४ आणि १७ या सात प्रभागांमध्ये पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा जास्त आहे.
नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसामान्यांसाठी राखीव असल्याने यंदाची नगरपंचायत निवडणुका अधिक रंगतदार झाली आहे.
नगर पंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. अर्जांची छाननी १७ नोव्हेंबर रोजी होईल आणि माघार घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असेल. उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
नगर पंचायतीची सदस्य संख्या १७ आहे. नगर पंचायतमध्ये प्रत्येक प्रभागातून एक सदस्य आणि जनतेतून नगराध्यक्षाची निवड करावयाची आहे. त्यामुळे मतदारांना दोन मते द्यावी लागतात.
नेवासा नगरपंचायतीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर तहसीलदार डॉ. संजय बिरादार आणि नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल फराटे हे सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहतील.
प्रभागनिहाय मतदार
प्रभाग १ – ९११ (४६१ पुरुष, ४५० महिला)
प्रभाग २ – १२३३ (५९० पुरुष, ६४३ महिला)
प्रभाग ३ – १०८५ (५३७ पुरुष, ५४८ महिला)
प्रभाग ४ – १४८९ (७२७ पुरुष, ७६२ महिला)
प्रभाग ५ – ११४५ (५७८ पुरुष, ५६७ महिला)
प्रभाग ६ – ७०८ (३५१ पुरुष, ३५७ महिला)
प्रभाग ७ – १४६० (७१८ पुरुष, ७४२ महिला)
प्रभाग ८ – ४३३ (२१५ पुरुष, २१८ महिला)
प्रभाग ९ – १४०४ (६८१ पुरुष, ७२३ महिला)
प्रभाग १० – १०९५ (५५३ पुरुष, ५४२ महिला)
प्रभाग ११ – १०४८ (५३४ पुरुष, ५१४ महिला)
प्रभाग १२ – १०७० (५१८ पुरुष, ५५२ महिला)
प्रभाग १३ – १२०१ (५९७ पुरुष, ६०४ महिला)
प्रभाग १४ – १२५२ (६४५ पुरुष, ६०७ महिला)
प्रभाग १५ – १०९४ (५४६ पुरुष, ५४८ महिला)
प्रभाग १६ – ९४७ (४४८ पुरुष, ४९९ महिला)
प्रभाग १७ – ११३७ (५९३ पुरुष, ५४४ महिला)



