google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

अर्सलाइन किंडर गार्टनचा ‘किड्स डे’ उत्साहात संपन्न

आकर्षक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग; नृत्यांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविष्कार; प्रमुख पाहुण्यांकडून कार्यक्रमाचे कौतुक

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा येथील अहिल्यानगर प्रभागातील अर्सलाइन किंडर गार्टन येथे शुक्रवार (दि.१३) रोजी किड्स डे संपन्न झाला. सायंकाळी संपन्न झालेल्या यावेळी बाल गटातील मुलांनी रंगीत कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
           कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. संजय बिरादार व बाल विकास प्रकल्प अधिकारी भावना पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड, नेवासा ज्ञान माऊली चर्च प्रमुख धर्मगुरू फा. दिलीप जाधव, अक्षय आढाव उपस्थित होते. यावेळी शिशु वर्गातील मुलांनी स्वागत गीते, चित्रपट गीते, गुजराथी नृत्य, किसान नृत्य, नाटिका इत्यादी कार्यक्रम सादर केले.
                कार्यक्रमाच्या अध्यक्षा बालविकास प्रकल्प अधिकारी भावना पवार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्याचे शाळा प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन ते सहा हा वयोगट महत्त्वाचा असून बालकांचा ८० टक्के विकास याच वयोगटात होत असल्याचे सांगितले. गेल्या वीस वर्षापासून दहावीच्या शंभर टक्के निकालाच्या उज्वल परंपरेचे कौतुक करून शिक्षक घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले.
            प्रमुख पाहुणे गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड म्हणाले की, सेंट मेरीज शाळा विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. सांस्कृतिक कार्यक्रमांतून सर्वच विद्यार्थी एकाग्रचित्ताने सहभागी होतात. त्यातून त्यांना स्टेज डेअरिंग तसेच सुप्त कलागुणांना वाव मिळतो. मोठ्यापणी विद्यार्थी शिक्षणामुळे केवळ नोकरीच करत नाही तर कलाकार तसेच खेळाडू ही बनतो, असे सांगून शालेय व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले
             मुख्याध्यापिका सिस्टर जोसी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर मारिया यांनी शाळेच्या कामकाजाचा मागोवा घेतला. विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिशू वर्ग शिक्षिका प्रतिभा पातारे, उज्वला आगळे, सुजाता भालेराव, ऋतुजा इंगळे, जागृती खिजवानिया, ट्वेंली, मेवारी तसेच विजय लोंढे, संदीप सरोदे, विष्णु खांदोडे, प्रशांत गायकवाड, सुरेश लव्हाटे, सकिना शेख, सुशीला लोंढे, सोनाली काळाणे, योगिनी बनगर, शबाना शेख, तृप्ती वाघ, अनिता मारकळी, सना कौसर शेख, रेश्मा लोखंडे, वैशाली साळवे, वैशाली ससाणे, संगीता पातारे, मीनल जाधव, मेघा शिंदे, पल्लवी कांबळे आदींनी प्रयत्न केले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मुनिबा बागवान, शिवराम आगळे, स्वरा नवगिरे, विराज बेल्हेकर, शरन्या आढाव, सात्विक लाळगे यांनी केले. शिशुवर्गाच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिसा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!