google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

आता थेट लाभार्थ्याच्या खात्यावर येणार अनुदान

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना होणार लाभ; बँक खात्याशी आधार, मोबाईल लिंक करण्याचे आवाहन

                                       स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील संजय गांधी योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना अनुदान शासनाकडून लाभार्थ्यांच्या खाती बँकेमार्फत अनुदान आतापर्यंत जमा करण्यात येत होते. परंतु आता शासन स्तरावरुन या पध्दतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांचे अनुदान आता शासनाकडुन थेट लाभार्थ्याच्या खात्यावर डि.बी.टी. प्रणाली व्दारे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी दिली. वरील बदलामुळे नेवासा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आपले आधारकार्ड व मोबाईल नंबर संलग्न करुन घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. 
               त्या शिवाय या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान माहे फेब्रुवारीपासून दिले जाणार नसलेने सर्व लाभार्थ्यांनी आपले खाते अपडेट करुन त्यास मोबाईल नंबर संलग्न करुन घ्यावा तसेच ज्या लाभार्थ्यांनी आपले खाते पुस्तक, आधारकार्ड व मोबाईल नंबर ही माहिती कामगार तलाठी यांचेकडे दिलेली नाही त्यांनी सदर कागदपत्रे तलाठी यांचेकडे जमा करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. संजय बिरादार व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार संदीप चिंतामण यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!