google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

डॉ. कौशिक यांना ‘इमिनंट शास्त्रज्ञ’ पुरस्कार

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-नेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कौशिक 

                                 स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक हे मागील 7 वर्षापासून केव्हीके दहिगाव-ने मध्ये प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
              डॉ. कौशिक यांनी प्रबंधनाच्या संयोगाने तसेच कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयोगाने शाश्वत ऊस, भात, तूर, गहु उत्पादन तंत्रज्ञान, रुंद सरी वरंबा पद्धती, विविध जातींचा प्रचार प्रसार, संचार माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध पिकांसाठी मोबाईल ॲप जसे ऊसतंत्र केव्हीकेडी, कापूसतंत्र केव्हीकेडी, डाळिंबतंत्र केव्हीकेडी, कांदातंत्र केव्हीकेडी त्याचप्रमाणे जैवसंतृप्त वाणांचा प्रचार व प्रसारमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चित्रकुट, ग्रामोदय विश्वविद्यालय चित्रकुट मध्ये आर.एस. कृषि शोध संस्थान प्रयागराज उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेमध्ये मा. कमल पटेल कृषि मंत्री मध्य प्रदेश शासन, डॉ. अरविंद कुमार शुक्ला, कुलगुरू राजमाता कृषि विद्यापीठ ग्वालियर व डॉ. भरत मिश्रा, कुलगुरू महात्मा गांधी चित्रकुट ग्रामोदय विश्व विद्यालय चित्रकुट यांच्या हस्ते इमिनंट शास्त्रज्ञ 2023 पुरस्कार मिळालेला आहे.
       
        डॉ. कौशिक यांनी नैसर्गिक शेतीची मुलभूत तत्त्वे आणि पद्धती या विषयावर या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. इमिनंट शास्त्रज्ञ 2023 पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, विश्वस्थ चंद्रशेखर घुले पाटील, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि., भेंड्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग व सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सचिव अनिल शेवाळे व सहसचिव रविंद्र मोटे यांनी अभिनंदन केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!