google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

डायल 112 ला तळीरामाचा काॅल आणि …

तरुणीवर अत्याचार झाल्याची दिली माहिती

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : गुरुवार दि. 11 रोजी रात्री 9 च्या दरम्यान अहमदनगर डायल 112 काॅलवर पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे येथील तळीराम सचिन दिगंबर पंडीत याने मो. 9503028417 काॅल करून सांगितले कि, अस्मिता नावाची 16 वर्षे वयाच्या तरुणीवर बलात्कार झाला आणि ती बेशुद्ध आहे, अशी माहिती दिली.
                       अहमदनगर जिल्हा डायल 112 युनिटला कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे व महिला अंमलदार चिमा काळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात संपर्क साधून शहानिशा करण्यास सांगितले. पारनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि. संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ यांनी आपल्या फौजफाट्यासह बाभूळवाडे (ता. पारनेर) गाठून घडलेला प्रकार हा तळीरामाने केला असल्याचे उघड झाले. संबंधित काॅल करणारा तळीराम सचिन दिगंबर पंडीत याच्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल संदिप पालवे यांचे फिर्यादीनुसार आयपीसी कलम 177 सह दारुबंदी अधिनियम 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डायल 112 काॅल हा मदतीसाठी मोफत सुविधा उपलब्ध आहे. कोणी बोगस काॅल केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ~अंबादास हुलगे, पोलीस उपनिरीक्षक अहमदनगर.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!