google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा आगाराला दहा बसेस व सुविधा द्या!

निवेदनाद्वारे ताके यांची मागणी; विभागीय वाहतूक अधीक्षकांना दिले निवेदन

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा बस आगाराला नवीन किमान १० बसेस देण्यात येऊन नेवासा आगार व बस स्थानकात विविध सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या अन्यथा सोमवार दि.१६ जुन रोजी नेवासा बस स्थानक बंदचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल ताके यांनी अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक जगताप व विभागीय वाहतूक अधीक्षक सी. एस. चौधरी यांना समक्ष भेट घेऊन निवेदनाने दिला आहे.
        राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात ताके यांनी म्हटले आहे की, नेवासा आगार हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेले वर्दळीचे ठिकाण आहे. परंतु नेवासा बस स्थानक व नेवासा आगारात असलेल्या नादुरुस्त व जुन्या बस, अपुरी चालक-वाहक संख्या, अनियमितपणा, विविध सुविधांचा अभाव या समस्यांमुळे प्रवासी जनता व चालक – वाहक यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन भविष्यात या आगराची प्रवासी संख्या घटण्याचा सावधानतेचा इशाराही अनिल ताके यांनी दिला आहे.
          नेवासा तालुक्यातील प्रवासी, भाविक – जनता व चालक – वाहकांच्या भावना लक्षात घेऊन नेवासा आगार व बस स्थानकात पुढीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी ताके यांनी मागणी केली. आहे त्या मागण्या पुढीलप्रमाणे….
१) चालक ७, वाहक ७ कमी आहेत त्यांची तात्काळ नव्याने नेमणूक व्हावी.
२) चालक ७८, वाहक ७४ सध्या उपस्थिती आहे
३) कमीत कमी १० बसेसची गरज आहे.
४) श्रीक्षेत्र देवगड –पंढरपूर ही पूर्वी नियमित चालू असलेली व सध्या बंद असलेली बस नेवासा तालुक्यातून एक टायमिंग परमनंट चालू करणे.
५) नेवासा आगारात  स्क्रू चेंज संभाजीनगर शिर्डी 12 बस, परळी त्र्यंबक 4 बस एकूण 16 बस मेंटेनससाठी आगारात येत असल्याने बहुसंख्य प्रवाशी आगारात येतात त्यांच्या टॉयलेट, बाथरूम व पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याची तक्रारी प्रवासी करतात. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अधिकृत कॅटीनसाठी परवाना देणे जेणेकरून सर्व प्रवाशी बांधवांची होणारी गेरसोय टळेल.
६) आगारात ज्या प्रकारे वॉचमन नेमणूक आहे त्याचप्रमाणे बस स्टँडवर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वॉचमन नेमणूक करावी.
           अन्यथा या मागणीसाठी आम्ही प्रवासी, भाविक, जनता यांना बरोबर घेऊन सोमवार दि.१६ जुन रोजी  नेवासा बस स्थानक बंद आंदोलन छेडणार आहोत, असा इशाराही अनिल ताके यांनी दिला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!