
स्वराज न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २२ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कै. माणिकराव नरसिंगराव पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगावरोड, अहिल्यानगर येथे पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
मेळाव्यात जिल्ह्यातील १५ ते २० नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार आहेत.
एचएससी, सर्व शाखेतील पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्रीधारक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/CDMcrNKWzDNpAbrL9 या लिंकवर आपली नोंदणी करून पात्रतेनुसार अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५, रोजगार मेळावा समन्वयक वसीमखान पठाण (९४०९५५५४६५), संतोष वाघ (८८३०२१३९७६), बद्रीनाथ आव्हाड (९४२०७२५२८०) आणि योगेश झांजे (९५८८४०८८९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



