google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यांगांच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ

मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेत घोषणा

                                      स्वराज न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा २५०० रुपये अनुदान देण्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत घोषित केले.

                   राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या दरमहा 1,500 रुपये अनुदानात आता थेट 1000 रुपयांची वाढ करून ते 2,500 रुपये करण्यात आले आहे.

            या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!