google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई

नेवासा बुद्रुक येथील घटना; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात धडक मोहीम राबवली आहे. काल दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री १:०० वाजेपर्यंत नेवासा बुद्रुक येथील नदीपात्रात हे विशेष ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. या कारवाई दरम्यान नदीपात्रातून वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तब्बल ७० तराफे / चप्पू जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य नदीकाठावर आणून जाळून नष्ट करण्यात आले आहे.
​              नष्ट केलेले साहित्य ७० अवैध तराफे/चप्पू. यातील एका तराफ्याची अंदाजे किंमत ४०,००० रुपये असून, या कारवाईत एकूण सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
​         नदीपात्रातील कारवाईसाठी श्रीरामपूर येथून खास बोट व विशेष पथक पाचारण करण्यात आले होते, ज्यांची या मोहिमेत महत्त्वपूर्ण मदत झाली. ​ही कारवाई उपविभागीय अधिकारी  सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली.
            अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू तस्करी खपवून घेतली जाणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अशा घटकांवर यापुढेही प्रशासनाची करडी नजर असून कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!