google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पैठण तालुक्यात जानकरांची कार्यकर्त्यांबरोबर भेट

जिल्हाध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्या निवासी बैठक; संघटन मजबूत करण्यावर भर

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
पैठण : (तालुका प्रतिनिधी विशाल दिलवाले)
      राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी पैठण तालुक्यातील वरुडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. जिल्हाध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
                 राष्ट्रीय समाज पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी राजकीय धोरणे आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत तालुक्यातील विविध विकासकामे आणि निवडणुकांच्या तयारीवरही विचारविनिमय झाला.
           यावेळी महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची खरी ताकद तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याने समाजाशी जोडलेले राहून लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच युवकांनी पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            या बैठकीस पैठण तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक पातळीवरील समस्या, विकासाची गरज आणि आगामी निवडणुकांची तयारी यावरही चर्चा झाली.
          प्रकाश दिलवाले यांनी आपल्या भाषणात महादेव जानकर यांचे आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाची विचारधारा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
              या भेटीमुळे पैठण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाला नवचैतन्य मिळाले असून, आगामी काळात पक्ष अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, महादेव जानकर यांनी सामान्य कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करून सकाळी पुढील दौऱ्यास प्रस्थान केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!