
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील घोडेगाव येथील इरिगेशन कॉलनीतील तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवार (दि. 31) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. त्यापैकी दोन जणांचे मृतदेह मिळाले असून एकाचा शोध सुरू आहे.

सोनई पोलीस स्टेशन येथे दिलीप रविंद्र काळे वय 48 वर्ष धंदा हॉटेल व्यवसाय रा घोडेगाव ता नेवासा जि अहिल्यानगर यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहतो. आज दिनांक 31 रोजी माझा भाऊबंद प्रथमेश सुभाष काळे वय 17 वर्ष, त्याचे मित्र जीवन रविंद्र आव्हाड वय 17 व शोयेब आयुब शेख वय 17 वर्ष सर्व राहणार घोडेगाव ता नेवासा हे दिनांक 31 रोजी दुपारी 05 यापूर्वी घोडेगाव इरिगेशन कॉलनीतील तळयामध्ये पोहेण्यासाठी गेले होते. ते तेथे पोहत असताना व मी घरी असताना मला समजले की, वरील मुले हे पाण्यात पोहत असताना सदर इरिगेशन कॉलनीतील तळयामधील पाण्यामध्ये पोहत असताना ते बुडाले आहेत. म्हणुन मी सदर ठिकाणी गेलो असता तेथे गर्दी जमली होती. तेव्हा जमलेल्या लोकांनी प्रथमेश सुभाष काळे वय 17 वर्ष हा पाण्यात बुडाल्याने तो मयत झाल्याने त्याचे पाण्यातुन त्याचे प्रेत आमचेसमोर बाहेर काढलेले होते. तसेच त्याचा मित्र जीवन रविंद्र आव्हाड वय 17 वर्ष रा घोडेगाव हा मयत झाल्याने पाण्यातुन त्याचे प्रेत आमचेसमोर बाहेर काढलेले होते.
शोएब आयुब शेख वय 17 वर्ष रा घोडेगाव याचे प्रेत अजुनपर्यंत पाण्यात सापडलेले नव्हते. तरी वरील मुले हे इरिगेशन कॉलनीतील तळयामध्ये पोहण्यासाठी गेले असता ते पोहत असताना पाण्यामध्ये बुडून दुपारी 5 वाजेचे पूर्वी मयत झाले आहेत. सोनई पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक 22/2026 बी.एन.एस.एस.क.194 प्रमाणे दाखल असून सदर तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.



