‘जय श्रीराम’च्या जयघोषांनी नेवासे दुमदुमले
शहर झाले भगवेमय; महिलांचे रिंगण झेंडापथक व लेझीम पथक ठरले आकर्षण; शोभायात्रेस रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा येथे श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीराम मंदिरावर चढविण्यासाठी झेंडा मिरवणूक व प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत सहभागी झालेले महिलांचे झेंडापथक व लेझीम पथक व रिंगण सर्व श्रीराम भक्तांचे आकर्षण ठरले होते. झेंडा मिरवणुकीचे हे २० वे वर्ष होते.
दरम्यान, श्रीराम नवमीनिमित्त नेवासे शहरात रामराज्य उत्सव समितीच्या बतीने रामजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला (दि. २९) प्रभू रामचंद्रांच्या १६ फुटी उंचीच्या भव्य मूर्तीची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सुमारे २५ हजारांहून अधिक रामभक्त सहभागी झाले होते. सियावर रामचंद्र की जय.. पवनसुत हनुमान की जय.. ‘प्रभू रामचंद्र भगवान की जय..’ अशा जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमून गेली होती.
रामराज्य समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभयात्रेस नेवासा येथील मळगंगा देवी मंदिरासमोरून श्रीक्षेत्र देवगड़ संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज व श्रीमध्यमेश्वर देवस्थानचे योगी ऋषीनाथ महाराज यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या १६ फुटी मूर्तीचे पूजन व आरती करून प्रारंभ झाला. मिरवणूक होते. मळगंगा देवी मंदिर, बसस्थानक, पंचायत समिती चौक, खोलेश्वर गणपती मंदिर चौक, नगरपंचायत चौक, हेगडेवार चौक, मारुती मंदिर चौकमार्गे प्रवरा नदीकाठी असलेल्या श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले. श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा मार्गावर गेल्यावर्षी श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेस काही समाजकंटकामुळे गालबोट लागून मोठा तणाव निर्माण झाला होता.