स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नेवासा शहरातील शेजूळ गल्ली प्रभागात घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हर्षदा संतोष नारळे (वय 16 ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. हर्षदा इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती.
नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत सागर देशपांडे यांनी म्हटले आहे की मी इन्कम टॅक्स सल्लागार म्हणुन काम पाहतो. माझ्याकडे संतोष नारळे हा मदतनीस म्हणुन काम करत असुन तो शेजुळ गल्ली, नेवासा खु ता नेवासा येथे त्याची पत्नी तीन मुली, एक मुलगा असे एकत्रित कुटुंबासह राहतो.
आज शुक्रवार (दि 31) रोजी दुपारी 3:30 वा चे सुमारास मी व संतोष नारळे असे माझ्या ऑफिसमध्ये काम करत असताना आम्हाला फोनवरुन समजले की, हर्षदा संतोष नारळे (वय 16 वर्ष रा शेजुळ गल्ली नेवासा खु ता नेवासा) हिने राहते घराचे पाठीमागे टॉयलेटमध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला आहे. असे सांगितल्याने मी व संतोष नारळे असे त्याचे राहते घरी गेलो व पाहिले असता हर्षदा नारळे हिला टॉयलेटच्या लॉखडी अँगलला स्कॉफने तिच्या गळ्याभोवती बांधलेले दिसले. तेथे जमलेल्या लोकाच्या मदतीने तिचे गळ्याचे स्कार्फ सोडुन तिला खाली घेतले. त्यावेळी ती बेशुध्द अवस्थेत होती. नंतर तिला उपचारासाठी करवंदे हॉस्पिटल नेवासा खु येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता ती उपचारापुर्वीचे मयत असल्याचे सांगितले. नंतर आम्ही मयत मुलीचे प्रेत पोस्टमार्टमसाठी नेवासा फाटा येथील घेवून गेलो.
दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नेवासा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.