google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मोक्यातील फरार आरोपी जेरबंद

आरोपीवर बारा गुन्ह्यांची नोंद; चार वर्षापासून होता फरार; नेवासा पोलिसांची कामगिरी

                                        स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : संघटित गुन्हेगारी (मोक्का) गुन्ह्यात हवा असलेला खतरनाक आरोपी नेवासा पोलिसांना जेरबंद करण्यात यश मिळाले असून सदर आरोपीच्या नावावर बारा गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. विविध गुन्ह्यांच्या तपास कामी तो पोलिसांना हवा होता.
           या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सन 2011 पासुन नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव या तीन तालुक्यामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, दरोड्याची तयारी इत्यादी 12 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला चपळ व खतरनाक आरोपी डीचन त्र्यंबक भोसले रा. सलाबतपुर, ता. नेवासा यास नेवासा डी.बी. पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
           मागील चार वर्षांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगर, पोलीस ठाणे नेवासा तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील पथके सदर आरोपीच्या मागावर होती. परंतु आरोपी हा मोठा चपळ असून घरी न झोपता शेत मळ्यांनी लपून-छपून राहायच्या. रात्रीच्या वेळी केळी, डाळिंब बागांमध्ये किंवा ऊसाच्या फडामध्ये झोपून राहायचा. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नियोजनाखाली मागील काही दिवसापासून नेवासा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने सलाबतपुर, वरखेड भागामध्ये उसाच्या केळीच्या व सोयाबीनच्या शेतामध्ये दिवसभर काम करून माहिती काढली.
              बुधवारी सलाबतपुर येथील एका पेट्रोल पंपावर मोटर सायकलमध्ये पेट्रोल भरताना दिसून आला असता त्याला पोलिसांची भनक लागताच त्याने मोटर सायकल सोडुन धुम ठोकली. पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटर पाठलाग करून त्यास चिखलामध्ये शिताफीने जेरबंद केले. सदर वेळी आरोपीकडून एक पल्सर मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली आहे.
           सदर आरोपी फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाद्वारे पोलीस ठाणे नेवासाकडील सौंदाळा व तरवडी येथील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये देखील वॉन्टेड होता. या आरोपीकडून पोलीस ठाणे नेवासा कडील आणखी काही चोरी जबरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
                सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव व सुनिल गंगावणे यांनी केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!