google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडमध्ये ‘सेंट मेरीज’चा डंका

शाळेला 'गोल्डन स्कूल' पुरस्कार; शिक्षक व विद्यार्थी विविध पुरस्कारांनी सन्मानित

                   स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : येथील अहिल्यानगर प्रभागातील सेंट मेरीज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केली. आज झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, चित्रकला, सामान्य ज्ञान, विज्ञान, गणित आणि संगणक इत्यादी विषयांच्या परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवले.
                गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तेजस्विनी सानप, विराज बेल्हेकर, आराध्या नागपुरे, कृष्णाली वाघ यांनी राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले. त्यांना रोख पारितोषिक, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. आयुष नांगरे, अहरोन खरात, वरद लोखंडे, हरबीर सचदे, अर्पित टेकणे, आराध्या लोखंडे, रजनीश चौधरी आणि यश चव्हाण या विद्यार्थ्यांना ‘एक्सलन्स मेडल अवॉर्ड’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
               सेंट मेरीज स्कूलला ‘गोल्डन स्कूल अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेतील शिक्षक वैशाली साळवे, प्रशांत गायकवाड, सोनाली काळाणे, मीनल जाधव, सुशीला लोंढे यांना ‘इन्स्पायरिंग टीचर्स अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सना शेख, मुबिना शेख, पल्लवी कांबळे, स्वाती पाटील, विजय लोंढे यांना ‘बेस्ट टीचर्स अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सिस्टर जोसी यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
               यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योतिस, शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर मारिया, कार्यालय प्रमुख सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संदीप सरोदे यांनी केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!