google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

नुकसान भरपाईसाठी अर्धनग्न आंदोलन

खा. लोखंडे यांना दिले निवेदन; नेवासा तहसील कार्यालयात झाले आंदोलन

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी जीवन ज्योत फाउंडेशनच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयात अर्ध नग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. सदाशिव लोखंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
           यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मागील वर्षी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर, बाजरी, मका व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते, सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते. अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे. त्यात उशीरा का होईना बळीराजाच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादी मध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे. त्वरित नुकसान भरपाई जमा करावी अन्यथा नाईलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने येत्या आठ दिवसात नेवासा फाटा शेवगाव राज्य मार्गावर भेंडा या ठिकाणी चक्काजाम व नग्न आंदोलन करण्यात येईल.
            या वेळी कमलेश नवले, छञपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, प्रदिप आरगडे, अक्षय बोधक, राहुल कांगुणे, प्रकाश मुळक, संजय ठुबे, आप्पासाहेब आरगडे, अभिजीत बोधक, शुभम आरगडे, राम आरगडे, संजय ऊरे, राजू गायकवाड, सागर नवथर, निलेश शिंदे, आम आदमी पार्टीचे संदिप आलवणे, करिम सय्यद, कृष्णा आरगडे उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!