google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

‘शब्दगंध’चे सुनील गोसावी यांचा अभिमान

डॉ अशोकराव ढगे यांचे कौतुकोद्गार; दीनमित्र पुरस्काराने गोसावी सन्मानित

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील तरवडी येथे नुकतीच दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची 138वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांना त्यांच्या ’आठवणीतील डोह’ या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यासंदर्भात त्यांचा सत्कार मा. कुलगुरू डॉ अशोकराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आला.
               डॉ. ढगे म्हणाले की, आमच्या शब्दगंध साहित्यिक परिषद कुटुंबातील व्यक्तीला हा सन्मान मिळाला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. गोसावी यांचे ‘आठवणीतील डोह’ हे पुस्तक वाचनीय तसेच चिंतनीय आहे. कारण यामधील लेख वस्तुनिष्ठ व जिवंत अनुभव सांगतात.
           याप्रसंगी कॉ बाबा आरगडे, श्रीमती शर्मिला गोसावी, दिगंबर गोंधळी, पांडुरंग रोडगे, प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे व शब्दगंध साहित्यिक परिषद कुटुंबातील नामवंत हजर होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!