google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

27 मे रोजी लागणार दहावीचा निकाल

एसएससी बोर्डाची अधिकृत माहिती

                                      स्वराज न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली आहे. येत्या 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना होती.

              राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. आता विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. 

                     mahahsscboard.inmahresult.nic.inmsbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!