google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

त्रासाला कंटाळून पित्याकडून मुलाची हत्या !

नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील घटना

                                      स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : भांडणाच्या त्रासाला कंटाळून पित्याने मुलाची हत्या केली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव) यांच्या शेती वाटपाच्या कारणावरून होणार्‍या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून दादा सारंगधर जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यावर मंगळवार (दि 14 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फळीने मारहाण करून हत्या केली.

          दि.18 मे रोजी मृतदेहाचा सर्वत्व दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्याची उकल उघडकीस आली. शिवाजी यांची आई अलका दादासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन नेवासा पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

               पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे हे करीत आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!