ब्रेकिंग
‘क्रांतिकारीचे’ नेवासा नगरपंचायतीत बहुमत!
निकाल नेवासा नगरपंचायतीचा!; नगराध्यक्षपदी महायुतीचे डॉ. करणसिंह घुले; 'क्रांतिकारी'ची अवस्था 'गड आला पण सिंह गेला' 'क्रांतिकारी'चा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार तर सतरा नगरसेवकपदासाठी 63 उमेदवार रिंगणात उतरले होते. क्रांतिकारी, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी चौरंगी लढत पहावयास मिळाली. आज जाहीर झालेल्या निकालामध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले हे विजयी झाले आहेत. यामध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नऊ नगरसेवक, महायुतीचे सहा नगरसेवक, आम आदमी पार्टीचा एक नगरसेवक व एक अपक्ष नगरसेवक विजय झाले आहेत. ‘क्रांतिकारी’चे नगरपंचायतीत बहुमत झाले असले तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. करणसिंह भाऊसाहेब घुले (शिवसेना) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नंदकुमार लक्ष्मणराव पाटील (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) यांचा 1 हजार 965 मतांनी पराभव केला. डॉ. करणसिंह घुले यांना 7 हजार 71 नंदकुमार पाटील यांना 5 हजार106 मते मिळाली.
प्रभाग निहाय : विजयी उमेदवार × पराभूत उमेदवार
प्रभाग क्रमांक 1 :
जयश्री चंद्रकांत शिंदे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) 388
राजश्री प्रभाकर आहेर (शिवसेना) 240
प्रभाग क्रमांक 2 :
शालिनी संजय सुखधान (आम आदमी पार्टी) 719
छाया दिगंबर धायजे (शिवसेना) 248
प्रभाग क्रमांक 3 :
अंकुश कचरु म्हस्के (शिवसेना) 533
रणजित दत्तात्रय सोनवणे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 170
प्रभाग क्रमांक 4 :
जितेंद्र भाऊसाहेब कुन्हे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 549
नितीन बबनराव जगताप (अपक्ष) 261
प्रभाग क्रमांक 5 : महेश शंकर लोखंडे (भारतीय जनता पार्टी) 385
दिलीप लक्ष्मण फटांगरे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) 352
प्रभाग क्रमांक 6 : संभाजी शिवाजी धोत्रे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) 313
विलास सखाराम बोरुडे (भारतीय जनता पार्टी) 237
प्रभाग क्रमांक 7 : भारती कृष्णा परदेशी (शिवसेना) 465
सुषमा गणेश कोरेकर (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) 434
प्रभाग क्रमांक 8 : मेघा संदीप सरकाळे (शिवसेना) 160
रोहिणी बाबासाहेब मोरे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) 115
प्रभाग क्रमांक 9 : शीतल निरंजन डहाळे (भाजपा) 573
चंद्रकला अण्णासाहेब बेहळे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 403
प्रभाग क्रमांक 10 : सागर उर्फ स्वप्निल राजेंद्र मापारी (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 321
इम्रान फारुख शेख (अपक्ष) 175
प्रभाग क्रमांक 11 :
शहीदाबी इलायतखान पठाण (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 438
अमित रमेश मापारी (भाजपा) 343
प्रभाग क्रमांक 12 :
सोनल राहुल चव्हाण (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 430
निता सुनील वाघ (भाजपा) 355
प्रभाग क्रमांक 13 :
नसरीन मुख्तार शेख (क्रांतिकारी) 493
नसिमबानो गणीभाई शेख (अपक्ष) 312
प्रभाग क्रमांक 14 :
शोभा प्रताप व्यवहारे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), 502
गंगूबाई नानासाहेब दारूटे (शिवसेना) 399
प्रभाग क्रमांक 15 :
प्रतिभा जलिंदर गवळी (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 251
गीता मनोज पारखे (भाजपा) 246
प्रभाग क्रमांक 16 :
प्रवीण शामराव सरोदे (अपक्ष) 342
सचिन दिलीप बनसोडे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), 186
प्रभाग क्रमांक 17 :
अनिल भाऊसाहेब पवार (शिवसेना), 456
अकुंश लक्ष्मण बड़े (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) 395
या निवडणुकीत महाविकास आघाडीने निवडणुकीतून सपशेल माघार घेतली असली तरी काँग्रेसने मात्र, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला होता. परंतु एकमेव जागा लढणाऱ्या काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. भाजप-सेनेत प्रभाग सातमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. यात शिवसेनेने बाजी मारली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नगराध्यक्ष पदासह सोळा नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये त्यांना नऊ जागा राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी पंधरा प्रभागात उमेदवार दिले होते. परंतु यातील एकही उमेदवार विजयी खाते खोलू शकला नाही.



