google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा शहरात नाताळ उत्साहाने साजरा

नाताळच्या मध्यरात्री विशेष प्रार्थनेचे आयोजन 

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : शहरातील ज्ञानमाऊली चर्चमध्ये नाताळचा पवित्र सण मोठ्या आनंदाने आणि भक्तीने साजरा करण्यात आला. चर्चचा परिसर रंगीबेरंगी दिवे, नाताळची झाडे, तारे आणि इतर आकर्षक सजावटींनी सजवण्यात आला होता. “शांती, प्रेम आणि आनंद” चा संदेश संपूर्ण परिसरात घुमत होता.

 

              नाताळच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीची विशेष प्रार्थना सेवा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या प्रार्थनेत प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्मरण करण्यात येऊन त्याग, प्रेम आणि मानवतेच्या संदेशावर प्रकाश टाकण्यात आला.
           नाताळच्या दिवशी पुणे येथील ‘निरोप्या’ मासिकाचे संपादक फादर भाऊसाहेब संसारे, नेवासा ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव, सहाय्यक धर्मगुरू फादर राजेंद्र लोंढे आणि फादर अक्षय आढाव यांनी मिस्सा अर्पण केला. फादर भाऊसाहेब संसारे आपल्या प्रवचनात म्हणाले की, ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे नाताळ हा भेटी गाठीचा सण आहे. आपण लोकांना भेटतो, त्यांची विचारपूस करतो. समोरच्याला आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे समजून घेतले पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा हा नाताळ सण आहे. आपण आपल्या जन्माचा अर्थ समजून घेतला पाहिजे. थोर पुरुषांची जयंती आपण साजरी करतो परंतु आपण त्यांची ध्येय समजून घेतले पाहिजेत. देवाला काय अपेक्षित आहे यासाठी काय केले पाहिजे म्हणजे आपले जीवन सार्थकी लागेल, याचा विचार आपण केला पाहिजे.
            आपल्याला त्यांच्या अपेक्षादेखील समजतात. आपण सर्वांना सोबत घेतले पाहिजे. आपण आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण महापुरुषांच्या जयंती साजरे करतो आणि याद्वारे आपण त्यांच्या जीवनाचा उद्देश समजून घेतला पाहिजे. जर आपण देवाची अपेक्षा समजून घेतली आणि त्यानुसार वागलो तर आपले जीवन अर्थपूर्ण होईल. नाताळ हा केवळ एक उत्सव नाही, तर एकमेकांप्रती प्रेम, क्षमा आणि सेवेची भावना आत्मसात करण्याचा सण आहे.
                 या प्रसंगी, चर्चमधील गायकांनी भजन आणि ख्रिसमस कॅरोल गायले. चर्च परिसरातील वातावरण भक्तीने भरले होते. यावेळी सिस्टर ज्योतिस, सिस्टर मारिया, सिस्टर सुक्रिन, सिस्टर लिसा आणि सिस्टर मुक्ता यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला.
           नेवासा तालुक्यातील इतर चर्चमध्येही नाताळ उत्सवादरम्यान सामाजिक एकता आणि बंधुत्वाचे सुंदर प्रदर्शन दिसून आले. सर्वांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आणि शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. उत्सवाच्या यशस्वी आयोजनात चर्च प्रशासन समिती उपाध्यक्ष प्रोफेसर हरीशचंद्र पंडित, मार्कस बोर्डे, प्रशांत बोर्डे सर, उमेश इंगळे, एकनाथ बोर्डे, बापूसाहेब वाघमारे, बाबासाहेब ठुबे, सतीश खरचंद सर, किशोर बोर्डे, डॉक्टर विलास जाधव, राजेंद्र बनसोडे सर, उद्योजक अविनाश गाढवे तसेच स्वयंसेवक तरुणांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!