स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : उड्डाणपूलावरून वेगात दुचाकी घेऊन जाणारा युवकाचा स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान वळणावर अपघात होवून तो उड्डाणपूलावरून खाली कोसळला. उड्डाणपूलावरून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. संकेत राजेंद्र डोळे (वय 21 रा. शहरटाकळी ता. शेवगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.

मंगळवार (दि. 18) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संकेत हा त्याच्याकडील दुचाकीने उड्डाणपूलावरून प्रवास करत होता. स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर अंदाज न आल्याने त्याची दुचाकी घसरून तो खाली पडला. दुचाकी उड्डाणपूलावरच होती.
गंभीर जखमी झालेल्या संकेतला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळच असलेल्या एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान तेथील डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले. दुपारनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला होता.
दरम्यान, अहमदनगर शहराच्या उड्डाणपूलावर अपघातांची मालिका सुरूच असून आत्तापर्यंत अनेकांना आपल्या जीवाचे मोल चुकवावे लागले आहे.