google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विकसित कृषि संकल्प अभियानाची सांगता

सांगता समारोप केव्हीके दहिगाव-ने येथे संपन्न

                    स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व विकसित कृषि संकल्प अभियानाचे आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून दरम्यान करण्यात आले होते. या अभियानाचा सांगता समारोप श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने, येथे दिनांक १२ जून रोजी पार पडला. या सांगता समारंभास, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कृषि विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
                 श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ तसेच कृषि विभाग व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने  विकसित कृषि संकल्प अभियान कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने च्या कार्यक्षेत्रातील ७ तालुके जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव व नेवासा मधील एकूण ९० गावांमध्ये राबविण्यात आले. सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नरेंद्र घुले पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अहिल्यानगर सुधीर बोराळे, आत्मा अहिल्यानगरचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे यांचे मार्गदर्शन लाभले. 
             कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने व इतर सहभागी सस्थांच्या शास्त्रज्ञांच्या दोन टीम तयार करून निवडक गावातील शेतकऱ्यांना कृषि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर पंधरा दिवसाच्या अभियानात शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात  नोंदवला. या अभियानादरम्यान शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके त्यांच्या शेतावर जाऊन देण्यात आली तसेच कृषि रथ गावोगावी फिरवून कृषि तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्यात आली.  
               या कार्यक्रमाच्या सांगता समारंभास राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीचे शास्त्रज्ञ डॉ. बसवराज पाटील, डॉ. के. एम. बोरय्या, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. ससाणे, डॉ. चवई, डॉ. अतार, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उप-शेतकी अधिकारी म्हस्के, तालुका कृषि अधिकारी शेवगाव अंकुश जोगदंड, केव्हीके दहिगावने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक व सर्व शास्त्रज्ञ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निबे यांनी केले तर माणिक लाखे यांनी आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!