स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम येथे अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने गंगापूर तालुक्यातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत कुंडलिक चव्हाण (वय 28) धंदा-शेती रा. नवाबपूरवाडी ता. गंगापूर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझे वडिल कुंडलिक लक्ष्मण चव्हाण (वय 65) यांना प्रवरासंगम येथील हंडाळ यांचे खताचे दुकानासमोर अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चालक अपघाताची खबर न देता निघून गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकावर अपघात तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.