google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवासा तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करा

शिवसेना पदाधिकारी करणार आमरण उपोषण; सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा तालुक्यात फोफावलेले अवैध व्यवसाय बंद करा, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी आमरण उपोषण करणार आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ आलेली आहे.
         
              गेल्या काही दिवसांपासून नेवासा तालुक्यात अवैध व्यवसाय वाढलेले आहेत. यामध्ये विनापरवाना दारू विक्री, ऑनलाईन बिंगो, मटका, जुगाराचे क्लब यामुळे सामान्य लोकांचे प्रपंच धुळीला मिळाले आहेत. ज्या ठिकाणी हे व्यवसाय चालू असतात त्या ठिकाणी टपोरी, दारू पिणारे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर जास्त असतो. यामुळे त्यांच्यामध्ये शिवीगाळ, भांडणे रस्त्यावर चालू असतात. यामुळे सामान्य नागरिक, महिला, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
                शिवसेना पदाधिकारी यांनी काही दिवसापूर्वीच नेवासा पोलीस निरीक्षक यांची भेट घेवून त्यांना हे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी विनंती केली होती. परंतु यामध्ये नेवासा पोलीस निरीक्षक यांनी कुठलीही कारवाई न करता उलट बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नेवासा पोलीस निरीक्षक यांची आज पुन्हा एकदा भेट घेवून आठ दिवसात हे अवैध व्यवसाय बंद करावे, असे निवेदन दिले आहे. अन्यथा दिनांक 5 जून रोजी सकाळी ठीक 9 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
                 निवेदनावर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख मीराताई गुंजाळ, तालुका प्रमुख संजय पवार, उपशहर प्रमुख बंडू शिंदे यांच्यासह कार्यकर्त्याच्या सह्या आहेत. तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. याविषयी तालुक्यातून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!