google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त

सहा जिवंत काडतुसेही हस्तगत; नेवासा पोलिसांची कामगिरी

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा शिवारात नेवासा पोलिसांनी गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद केला आहे.
               पोकॉ शाम गुंजाळ यांनी या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, सोमवार (दि. 22) रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माळीचिंचोरा फाटा येथे एक इसम संशयितरित्या फिरत असल्याचे दिसल्याने पोलीस पथकाने घेराव घालून त्याला नाव, गाव विचारले असता त्याने आकाश संजय पवार (वय 23 रा. ब्रम्हतळे, ब्रम्हनगर नागरदेवळे, भिंगार ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे, एक मोबाईल व त्याची वापरती एक मोटारसायकल असा मुद्देमाल मिळून आला.
            सदर इसमास ताब्यात घेवून नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं 556/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, महिला पोलीस नाईक सविता उंदरे, कॉन्स्टेबल सुमित करंजकर, गणेश इथापे यांनी केली असुन पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!