google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

दीड टन प्रतिबंधित मांगूर मासे पकडले

नेवासा पोलिसांची कारवाई; 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

                            स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : शासनाने प्रतिबंधित केलेले दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे व पिकअप जीप नेवासा पोलिसांनी गिडेगाव शिवारातून जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

       याबाबत पोकॉ रामचंद्र वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 03 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याचे सुमारास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक माने असे आम्ही गोंडेगाव तालुका नेवासा भागात पेट्रोलिंग करत असतात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिकअप जीप (एमएच 17 एजे 6575) या वाहनात दोन इसम प्रतिबंधित मांगुर मासे भरून ते सुरेगाव दही या गावाकडून गोंडेगाव मार्गे नेवासा गावाच्या दिशेने जात आहेत. अशी माहिती मिळाल्याने आम्ही गोंडेगावकडे येणारे रोडवर थांबलो असता सायंकाळी 4:15 च्या सुमारास बातमीतील नमूद जीप समोरून आली. तिला थांबवले असता समोरील बाजूस दोन इसम बसलेले होते. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपले नाव अमोल सुदाम म्हस्के (वय 28) रा. गोगलगाव ता. नेवासा तसेच शालीद मंगलभीम गायकवाड (वय 21) रा. गारखेडा ता. जामनेर जिल्हा जळगाव असे सांगितले. आरोपींना मासे कुठे घेवून जात आहात ? असे विचारले असता त्यांनी भिगवन ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे विक्री करण्यासाठी घेवून जात आहोत असे सांगितले.

          दोघे इसम तसेच त्यांच्या ताब्यातील पिकअप जीप (एमएच 17 एजे 6575) मध्ये मागील भागात ताडपत्रीमध्ये असलेले पाणी व त्यातील अंदाजे दीड टन वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगूर जातीचे जिवंत मासे 150 रुपये किलो दराचे (एकूण किंमत तीन लाख रुपये), एक पांढर्‍या रंगाची पिकअप जीप अंदाजे 5 लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आली.
         
       मत्स्य विकास विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून घेवून माशांबाबत खात्री केली असता भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका निर्माण करणारे व त्याची विक्री व वाहतुक बंदी असलेले शासनाने प्रतिबंधीत केलेले मांगुर जातीचे मासे आहेत. असा अभिप्राय त्यांनी दिला. शासनाचे आदेशाचा जाणीवपुर्वक भंग केला म्हणून दोघांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!