google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

जन्मठेपेची शिक्षा लागलेला फरार आरोपी जेरबंद

नेवासा पोलिसांची कामगिरी

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी त्याचे राहते घरी आला असल्याची माहिती मिळाल्याने नेवासा पोलीस फरार आरोपीच्या घरी शोध घेणेकामी गेले असता सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच तो त्याचे घरासमोरील गेटवरुन उडी मारुन पळुन जाताना पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले.
           सदर घटनेची हकिकत अशी की दि. 29/10/2007 रोजी नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 245/2007 भादवि 302, 307 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपी किसन भगवान केंदळे रा संभाजीनगर नेवासा खु ता नेवासा व इतर आरोपींना सेशन कोर्ट श्रीरामपुर यांनी दि. 30/08/2010 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. तेव्हापासून आरोपी किसन केंदळे याने उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे सदर शिक्षेविरोधात अपील दाखल केले होते व तो तेव्हापासून फरार झालेला होता. त्यास उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी सदर शिक्षा कायम ठेवली आहे. त्यास पकड वॉरंट सेशन कोर्ट श्रीरामपुर यांनी जारी केले होते तेव्हापासुन तो आपले राहते घर सोडुन दुस-या ठिकाणी नाव बदलुन राहत होता.
         सदर कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ तुळशीराम गिते व पोकॉ अंबादास ससाणे यांनी केली. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!