गुन्हेगारी
हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा
दोन परप्रांतीय मुलींची सुटका व एक महिला आरोपी ताब्यात; पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
स्वराज न्यूज नेटवर्क
नगर विशेष प्रतिनिधी : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतले जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे हायवे परिसरातील घाटात पोखरी शिवारात बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली.

एका महिला आरोपीविरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे. सदरचा कुंटणखाना चालविण्यास प्रोत्साहन देणार्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय दोन बंगाली तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. त्यामुळे पठार भागात एकच खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, चा. पो. ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ, म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.