स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील सोनई येथील स्टेट बँकेच्या समोर लावलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीतून बुधवार (दि. 2) रोजी दुपारी 12:45 वा अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपये पळवले आहेत. या घटनेच्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे सोनई पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
याबाबत रावसाहेब पंढरीनाथ लांडे (वय 76) धंदा-शेती रा. लांडेवाडी ता. नेवासा यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोनई शाखेतील पैसे काढून ते हॅन्डबॅगमध्ये ठेवले. ही हॅण्डबॅग मोटारसायकलच्या (एमएच 16 बीएल 558) डिक्कीत ठेवून डिक्की लॉक केली व तिथेच मित्राबरोबर बँकेच्या आवारात मोटरसायकलकडे पाठ करून उभे राहून बोलत होते. त्याच वेळी मोटरसायकलची डिक्की अज्ञात चोरट्याने उघडून त्यातील 2 लाख रुपये, पासबुक व चेक बुक चोरून नेले.
या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 350/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे पुढील तपास करत आहे.