google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

नेवासा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू

प्रवेश क्षमतेत वाढ; आता मिळणार 144 जागा

                                   स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेवासा येथे वेल्डर, प्लंबर, सीविंग टेक्नॉलॉजी, फिटर, वायरमन, इलेक्ट्रिशियन या व्यवसायांचे ऑगस्ट 2023 प्रवेश सत्रासाठी एकुण 104 जागा उपलब्ध होत्या. डिजीटी, नवी दिल्ली यांचेकडुन नव्याने एप्पल एफिलेशन प्राप्त झाल्याने इलेक्ट्रिशियन व वेल्डर या व्यवसायांची नवीन तुकडया या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. प्रवेश क्षमतेत वाढ झाल्याने ती क्षमता आता 104 ऐवजी आता 144 झालेली आहे. 
         
          इच्छुक उमेदवारांनी 24 ऑगस्टपर्यंत आपले नवीन प्रवेश अर्ज www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावेत. ज्यांनी पुर्वीच प्रवेश अर्ज भरलेले आहेत. त्यांनी प्रवेश वेळापत्रकानुसार आपल्या ऑप्शनमध्ये बदल करुन नवीन व्यवसायात आपला पसंतीक्रम नोंदवावा. अधिक माहितीसाठी आय. टी. आय. नेवासा येथे संपर्क करावा. किंवा www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेवासा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!