क्रिडा व मनोरंजन
शेणवडगांव शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न
नृत्य अविष्कारावर थिरकली चिमुकल्यांची पावले; विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण; मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती

स्वराज न्यूज नेटवर्क
राहुरी : राहुरी तालुक्यातील जिप प्राथमिक शाळा शेणवडगांव येथे बुधवार दि. 2 एप्रिल रोजी पहिल्यांदाच मा.आ. भाऊसाहेब कांबळे, राजू भाऊ शेटे, धर्मवीर संभाजी युवा प्रतिष्ठान, मास्तर गणेश जगदीशन, फिल्म निर्माता सेलिब्रेटी, शिवाजीराव कपाळे, साई आदर्श मल्टीस्टेट व गोरक्षनाथ विटनोर शिक्षक बँक संचालक या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदाने पार पडले.
या वेळी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ थीम घेऊन गण गवळण, शेतकरी गीत, पोवाडा, लावणी, आदिवासी गीत, देशभक्ती गीत या सर्वांची सांगड घालत चिमुकल्याची पावलं थिरकली. यावेळी गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच ग्रामसेविका, यांना भार्गवी मेकओव्हरकडून सन्मानित करण्यात आले. महिलांच्या विविध उखाणा, रांगोळी, पाककृती, संगीत खुर्ची, या स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच गावातील सर्व माता, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिंदे यांनी केले. संपूर्ण नृत्याची कॉरिओग्राफी विकास घोगरे व भार्गवी पुराणिक यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास घोगरे यांनी केले. आभार दीपाली पुराणिक यांनी व्यक्त केले



