google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

प्रवरा नदीपात्रात मामा भाच्याचा बुडून मृत्यू

नेवासा तालुक्यातील घटना

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : अंघोळीसाठी गेलेल्या मामा भाचे यांचा प्रवरा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पाचेगाव येथे गुरुवारी दि.21 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या वाजेच्या सुमारास घडली.

         किरण सुरेश देठे (वय 28 रा.पाचेगाव ता. नेवासा) व त्यांचा भाचा अनुज प्रवीण भालेराव (वय 10 रा. खोसपुरी ता नगर) असे बुडून मृत्यू झालेल्या मामा भाच्याचे नाव आहे अनुज भालेराव हा नुकताच आपल्या आई वडीलासोबत मामाच्या गावाला दिवाळी सणासाठी आलेला होता. एकुलता एक मुलगा बुडून मृत्यू पावल्याने घटनास्थळी आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडला.

           स्थानिक युवकांनी दोन्ही मृतदेह नदीपात्राच्या पाण्यातुन बाहेर काढले. मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी नेवासा पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!